Friday, October 22, 2021

आमदार लंकेंच्या एन्ट्रीने खा. सुजय विखे धास्तावले ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:खा. सुजय विखे यांनी नगर व श्रीगोंदे येथे बोलताना आ.निलेश लंके व आ.रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आ. लंके व आ. पवार कोरोना संकटकाळात  करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल खा. विखे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आम्हीही भरपूर काम केले पण आम्ही गाजावाजा केला नाही, असा खा. विखे यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान आमदार नीलेश लंके पुढील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार असतील, या शक्यतेने खासदार डॉ. सुजय विखे धास्तावले आहेत. त्यामुळेच ते आ. लंके व कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बिनबुडाची टिका करत असल्याचे सांगत आ. नीलेश लंके समर्थक दादा शिंदे व कारभारी पोटघन मेजर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

दुसरीकडे कोरोना काळात आ. लंके यांनी जीवावर उदार होऊन आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत शरदचंद्र पवार महाकोविड सेंटरच्या माध्यमातून परदेशासह देशात व राज्यात आदर्श काम उभे केले असल्याचे संदीप चौधरी व भाऊ चौरे यांनी म्हटले आहे.आ. लंके यांनी दीड वर्षापूर्वी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या

काळात तसेच कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत अहोरात्र काम केले.स्वत:च्या जिवाची व कुटुंबांची पर्वा केली नाही. गरजू कोणत्याही मतदारसंघातील वा राज्यातील असो त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. टाळेबंदीच्या काळात हजारो परप्रांतीय मजुरांसाठी अन्नछत्राबरोबरच आश्रयस्थानांची व्यवस्था केली. मतदारसंघातील विलिगीकरण कक्षात दाखल झालेल्या नागरिकांसाठी जेवणाची सोय केली.

अन्नक्षत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला.कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने पहिल्या लाटेत कर्जुले हर्या येथे तर दुसर्‍या लाटेत भाळवणी येथे शरदचंद्र पवार कोविड उपचार केंद्रांची उभारणी केली. या दोन्ही केंद्रात उपचार घेतलेले सुमारे 17 हजार कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले. या दोन्ही केंद्रात विनामूल्य, आनंदी, उत्साही वातावरणात उपचार करण्यात आले.

त्यामुळे रूग्णांना धीर मिळाल्याने कोरोनामुक्त होण्यास मदत झाली. 17 हजार रुग्णांचे तब्बल दोनशे कोटी रुपये वाचले.
आ. लंके कोरोना संकटकाळात करीत असलेल्या कामाची दखल केवळ राज्याने नव्हे तर देशाने घेतली.उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने आ. लंके यांच्या कामाची दखल घेत कोरोना उपचार केंद्रातील उपचारांसह व्यवस्थापनाचा अभ्यास केला.

त्यामुळे केवळ नगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात आ. लंके यांची लोकप्रियता वाढली. ती सहन न झाल्याने केवळ द्वेषभावनेतून खा. विखे त्यांच्यावर टीका करीत असल्याची भावना आ. लंके समर्थकांबरोबरच जिल्ह्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे. आ. लंकेे यांच्या कामामुळे, त्यांच्या लोकप्रियतेमुळे खा. विखे धास्तावले आहेत. आ. लंके लोकसभा

निवडणुकीतील प्रबळ विरोधक असू शकतात, या भावनेतून खा. विखे संतूलन गमाऊन बसले आहेत. त्यांनी आ. लंके व आ. पवार यांच्यावर बिनबुडाची टीका करण्यास सुरुवात केली असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!