Thursday, February 12, 2026

जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाचा इशारा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

मोहटे(पाथर्डी) दि.४ जून २०२५

पाथर्डी तालुक्यातील मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे येथील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लालबावटा कामगार युनियनने आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे येथील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लालबावटा कामगार युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बुधवार दि. ४ जून २०२५ रोजी
सायंकाळी मोहटे येथे पार पडलेल्या युनियनच्या सर्व सदस्य आणि सभासदांच्या बैठकीत, ट्रस्टकडून कर्मचाऱ्यांच्या वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष लांडे, जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. सुधीर टोकेकर, सहसेक्रेटरी वसंत मोहन दहिफळे, उपाध्यक्ष मारुती सुदाम दहिफळे यांच्यासह सदस्य अमोल गायकवाड, राजेंद्र दहिफळे, बबन पालवे आणि इतर अनेक कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे येथील कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली. देवस्थान कर्मचाऱ्यांनी ट्रस्टला दिलेल्या पत्रात सात दिवसांच्या आत झालेले ठराव आणि तडजोडीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. मात्र, आजपर्यंत ट्रस्टकडून या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.यामुळे संतप्त झालेल्या लालबावटा कामगार युनियनने मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने अहिल्यानगर येथील माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संबंधित विभागांना लवकरच पत्रव्यवहार केला जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. देवस्थान कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे युनियनने सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!