Tuesday, December 16, 2025

रांजणगावदेवी येथील स्वामी आई महिला ग्रामसंघाचे कार्यालयाचे उद्या उद्घाटन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वामी आई महिला ग्रामसंघ, रांजणगावदेवी या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उद्या शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल साहेब व नेवासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती संगीता वाळुंजकर यांनी दिली.

स्वामी आई महिला ग्रामसंघाचे कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास
श्री.दीपक कुमार (मॅनेजर, बँक ऑफ बडोदा),श्री.अर्जुन सोनवणे (तालुका अभियान व्यवस्थापक),श्री. केशव गायकवाड(प्रभाग समन्वयक),श्री.सरिता मुंडे (मंडल आधिकारी),श्री. ऐश्वर्या देशमुख (B.M.M.I.S),श्री. सुजाता कीर्ती शाही (प्रभाग समन्वयक),श्री. रमेश गायके (ग्रामसेवक),श्री. मीनाताई कदम (प्रभाग समन्वयक),श्री. ज्ञानेश्वर कांबळे (प्रभाग समन्वयक),कु.श्वेता काळे (तलाठी),श्री. विलास राठोड (B.M.F.I),
श्री.गणेश मेथे (प्रभाग समन्वयक),श्री.निखिल नागे (C.O माती स्पर्श कंपनी),श्री. नितीन पंडित (प्रभाग समन्वयक),श्री. दीपक दरोडे (पशु व्यवस्थापक),श्री.कल्पना लोखंडे (सरपंच) आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामीआई ग्रामसंघाचे पदाधिकारी, सर्व बचत गट महिला व ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव देवी यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!