Saturday, May 16, 2026

अब्दुलभैया शेख यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचे अजितदादांकडून कौतुक

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी कुकणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुल भैया शेख यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचे कौतुक केले.

शुक्रवार दि.६ जून रोजी अब्दुल भैया शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत नेवासा विधानसभा मतदार संघातील विकास कामासंदर्भात प्रस्ताव देऊन चर्चा केली.
या चर्चे दरम्यान अजितदादांनी अब्दुल भैया शेख हे नेवासा तालुक्यात करत असलेल्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत कौतुक केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य वेळी योग्य संधी देत असते, चांगले काम करा अशा सूचना दादांनी दिल्या.
येणाऱ्या काळात ना. अजितदादांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अब्दुल भैया शेख यांनी यानिमित्ताने दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!