Thursday, February 12, 2026

नागेबाबाचे आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नागेबाबा परिवाराचे आरोग्य मित्र सुभाष फकिरा  गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय व विशेष कल्याण विभागाने दि.६ जून २०२५ च्या शासन निर्णयाने सन २०२३-२४ या वर्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर केले आहेत.

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाजसेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून
प्रेरणा मिळावी, जेणे करुन सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनाने सन १९७१-७२ पासून व्यक्तींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार / समाजभूषण पुरस्कार योजना सुरु केलेली आहे. सन १९८९ पासून संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तथापि, सन २०२३-२४ या केवळ एक वर्षासाठी ६१ व्यक्ती व १० संस्था असे एकूण ७१ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

सन २०२३-२४ या वर्षाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील खैरी निमगाव (ता.श्रीरामपूर) येथील सुभाष फकिरा गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
श्री.गायकवाड हे रुग्णांच्या मदतीला देवदुताप्रमाणे धावून येणारे नागेबाबा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे आरोग्य मित्र आहेत. त्यांनी आजवर अनेक रुग्णांना शासकीय तथा दानशूर व्यक्ती, सहकारी संस्थाद्वारे मोठी मदत मिळवून दिलेल्याने कित्येक रुग्णांना पुनर्जीवन प्राप्त झालेले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!