Thursday, February 12, 2026

उस्थळ दुमाला शिवारातील अपघतात १ ठार १२ जण जखमी

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात झालेल्या क्रुझर व ट्रक अपघतात १ ठार तर इतर १२ जण जखमी झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

यबाबद तालुका बोदवड, जिल्हा जळगाव येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते.
बोदवड कडे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर उस्थळ दुमाला गावाचे हद्दीत पहाटे 05.15 वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकवर पाठीमागील बाजुस डॅश केल्याने क्रुझर गाडीमधील प्रथमेश तेली नावाचा एक मुलगा जागेवरच मयत झालेला आहे. आणखी एक वृषभ सोनवणे नावाचा मुलगा गंभीर जखमी आहे. इतर 11 मुलांवर नेवासा फाटा येथे उपचार चालू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे स्वतः घटनास्थळी हजर झाले.
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व जखमींना ॲम्बुलन्समधून पाटील हॉस्पिटल नेवासा फाटा येथे उपचारसाठी हलविन्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!