Monday, November 10, 2025

बनावट ॲप घोटाळ्यातील कारवाईसाठी शिंगणापुरात काँग्रेसचे धरणे आंदोलन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

शनिशिंगणापूर मधील बनावट ॲप घोटाळ्याची तातडीने चौकशी व्हावी व तातडीने कारवाई व्हावी यासाठी काँग्रेस व विविध संघटनाकडून शिंगणापूर देवस्थान आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.

शनीशिंगणापूर मध्ये काही कर्मचाऱ्यांनी, पुजाऱ्यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून तसेच बनावट देणगी पावती व बनावट QR च्या माध्यमातून करोडो रुपयाचा घोटाळा करून हा निधी आपल्या खाजगी खात्यावर वळून घेतला. यात देवस्थानची व देशभरातील शनिभक्तांची मोठी लूट या घोटाळा बहाद्दरांनी करून दाखवली. याविरोधात काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक व धर्मदाय उपायुक्त यांची भेट घेऊन चौकशीची मागणी देखील केली.तर देवस्थान प्रशासनाकडे त्यांनी परवानगी दिलेल्या ॲपबद्दल माहिती मागण्यात आली होती. यामध्ये धर्मदाय आयुक्त यांचे परवानगी पत्र, ट्रस्टचा ठराव, करारनामा अशी माहिती मागण्यात आली होती. देवस्थान प्रशासनाने हि माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने व घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घातल्याने इतर ॲपची माहिती दाबण्याचा प्रयत्न केल्याने आज देवस्थान आवारात काँग्रेस व विविध संघटनाकडून देवस्थान आवारात भर उन्हामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या घोटाळ्याचा तीव्र गतीने तपास करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी देवस्थान प्रशासनाने फक्त तीन ॲपवर कारवाईची मागणी करून इतर ॲपवाल्याना व बनावट पावती पुस्तकं घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घालणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पूर्ण कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे यांनी या घोटाळ्यात देवस्थानचे कर्मचारी, पुजारी, अधिकारी सहभागी असल्याचा आरोप करत भाविकांच्या श्रद्धेला यांनी गंडा घातल्याचा आरोप केला.

हरीश चक्रनारायण यानी देवस्थान आता सरकार जमा करण्याची वेळ आली असून प्रशासकाची याठिकाणी गरज आहे त्याशिवाय भ्रष्टाचार दूर होऊन कारभार सुरळीत होणार नाही. तसेच यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल,महिला अध्यक्ष शोभा पातारे, स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे,बहुजन वंचितचे विजयसिहं गायकवाड, संजय वाघमारे यांनी देखील याविरोधात मनोगत व्यक्त केले. तर आंदोलनात संजय होडगर, कानिफ जगताप, सुमित पटारे, संदीप मोटे, सतीश तऱ्हाळ, गोरक्षनाथ काळे, आदीसह शनिभक्त सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना निवेदन दिले. यात पुढील आठ दिवसात योग्य तपास न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!