Tuesday, March 31, 2026

महाराष्ट्र अंनिसचे निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उद्या नगर मध्ये सत्कार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा बैठक उद्या गुरुवार दि. १२ जून रोजी दुपारी २:३० वाजता
हमाल पंचायत मार्केट यार्ड,अहिल्यानगर येथे होणार असून या बैठकीत महाराष्ट्र अंनिसचे निर्वाचित अध्यक्ष माधव बावगे तसेच राज्य प्रधान सचिव पदी डॉ. ठकसेन गोराणे तर बुवाबाजी संघर्ष विभाग राज्य कार्यवाह पदी अड.रंजना गवांदे यांची निवड झाल्याबद्दल आणि स्व.सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुखदेव
फुलारी यांचा जिल्हा अंनिसच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी दिली.

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक पदांवर ज्यांनी भुषणावह काम करून अधिराज्य गाजवले असे हमाल पंचायतीचे माजी जिल्हा अध्यक्ष तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी जिल्हा अध्यक्ष क्रांतीदीप काॅ.बाबा आरगडे यांचा गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभ ही गुरूवार दि.१ २/६/२०२५ रोजी मार्केट यार्ड ,हमाल भवन , अहिल्या नगर येथे
पद्मश्री पोपटराव पवार व आ. संग्राम भैय्या जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत आहे.
तरी या कार्यक्रमासह बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड,जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा,जिल्हा सचिव देवदत्त साबळे व.पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!