नेवासा
नेवासा तालुक्यातील देडगाव येथे शेत जमीनीचे झालेल्या वादातून डोक्यात पहारीने वार
करुन जीवानीश ठार मारण्याचा प्रयत्न जखमी आदिनाथ कारभारी बनसोडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून
यातील तीन आरोपी पैकी एका महिला आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधवयांनी दिली.
याबाबद गोरक्षनाथ आदिनाथ बनसोडे (वय 33 वर्ष)धंदा.शेती रा. देडगाव ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी
डॉ. पाटिल शिवसंगीता हॉस्पीटल, नेवासा फाटा येथे जनरल वॉर्ड बेड नं. 16 वर उपचार घेत असताना नेवासा पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की,
माझे घराशेजारी माझा चुलत भाऊ नामे चंद्रकांत आसाराम बनसोडे हा त्याचे पत्नी सविता बनसोडे, मुलगा बबलु उर्फ रोहित बनसोडे यांचेसह रहाण्यास आहे. मागील अंदाजे 5 वर्षापासून माझे वडिलांचे नावे असलेल्या देडगाव येथील शेत गट क्र. 425/1 वरुन आमचे वाद सुरु आहेत. तहसीलदार नेवासा यांचे आदेशाने सदर शेतीचा रस्त्या बाबतचा निकाल आमचे बाजुने लागलेला आहे. परंतु चंद्रकांत बनसोडे यानी शेतजमीन त्यांना वाटणीमध्ये कमी मिळाली म्हणून नेहमी माझेशी व माझे कुटुंबासोबत वाद व शिवीगाळ करत असे, प्रत्येक वेळी मी व माझे वडिलांनी चंद्रकांत व त्याचे मुलास शेतजमीन मोजणी करण्याबाबत समजावुन सांगत असे. परंतु वेळोवेळी चंद्रकांत त्याचे कुटुंबासह आम्हास त्रास देत असे.
आज दि.09/06/2025 रोजी अंदाजे 11:30 वाजेचे सुमारास मी माझ्या कुटुंबासह घरी असताना तेथे चुलत भाऊ चंद्रकात आला असता मी त्यास आमचे शेतामध्ये तु मकाची पेरणी का केलीस असे मी व माझे वडिल घरासमोरील अंगणात विचारपुस करत असताना चंद्रकांत याचा मुलगा रोहित हातात लोखडी पहार घेवुन पळत आला व त्याने काहि एक विचार न करता माझे वडिल आदिनाथ बनसोडे याचे डोक्यात पहारीने वार करून गंभीर जखमी करून जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चंद्रकांत याने मला वरून हातातील विटेने माझे डावे डोळ्यावरील भुवईवर मारुन दुखापत केली. सविता बनसोडे भांडण ठिकाणी आली असता तीने मला लाथाबुक्क्याने मारहाण करुन यांना आज जीवे ठार मारा, सोडु नका असे म्हणून शिवीगाळ केली, आमचे भांडण बघुन आमचे घराशेजारी रहाणारे भाऊसाहेब बनसोडे, माझी पत्नी काजल बनसोडे, आई निराबाई बनसोडे यांनी मध्ये पडुन मला व माझे वडिलांना भांडणातुन सोडवले. आरडा ओरडा ऐकुन चंद्रकांत व त्याचा मुलगा रोहित त्याची पत्नी सविता बनसोडे हे तेथून पळून गेले.
माझे वडिलांचे डोक्यातून रक्त येत असल्याने व ते बेशुध्द झाल्याने मी जखमी अवस्थत आमचे गावातील अम्बलन्सला कॉल करुन बोलावले व मी, माझे वडिल आदिनाथ बनसोडे व नातेवाईकासह ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे आलो. तेथील डॉक्टरानी माझे वडिलांवर उपचार करुन अहिल्यानगर येथे उपचारसाठी पाठविले. मी जखमी असल्याने नेवासा फाटा येथील डॉ.पाटिल शिवसंगीता हॉस्पीटल, नेवासा फाटा येथे उपचारा करीता दाखल झालो. तसेच माझे वडिलांना पुढिल उपचारा करीता मॅककेअर हॉस्पीटल अहिल्यानगर येथे दाखल केले असल्याचे मला समजले आहे.
तरी आज दि.09/06/2025 रोजी सकाळी 11:30 वाजेचे सुमारास चुलत भाऊ चंद्रकांत त्याची पत्नी सविता व त्याचा मुलगा रोहित यांचेशी शेत गट क्र. 425/1 चे झालेल्या वादातून रोहित बनसोडे याने माझे वडिल आदिनाथ कारभारी बनसोडे यांचे डोक्यात पहारीने वार करुन जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच चंद्रकांत आसाराम बनसोडे याने हातातील विटेने माझे डावे डोळ्याचे भुवईवर मारुन जखमी केले व सविता बनसोडे हिने लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. तरी माझी वरील लोकांविरुध्द फिर्याद आहे.
या फिर्यादि वरून चंद्रकांत आसाराम बनसोडे, सविता चंद्रकांत बनसोडे, बबलु उर्फ रोहित चंद्रकांत बनसोडे सर्व रा.देडगाव,ता.नेवासा यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5) नुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेतील जखमी आजिनाथ बनसोडे यांचे मंगळवार दि.१० जून रोजी पहाटे निधन झाल्याने या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. यातील महिला आरोपी सविता बनसोडे हीस अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत