Friday, February 13, 2026

आरोग्यमित्र सुभाष गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्था व नागेबाबा परिवाराचे आरोग्य मित्र सुभाष फकिरा गायकवाड (रा.खैरी निमगाव, ता.श्रीरामपुर) यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय व विशेष  कल्याण विभागाच्या वतीने  सन २०२३-२४ या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील  खैरी निमगाव (ता.श्रीरामपूर)  येथील सुभाष फकिरा गायकवाड यांना जाहीर झाला होता.

त्याचे वितरण आज मंगलवार दि.१० जून रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार संतोष बांगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री.गायकवाड हे  रुग्णांच्या मदतीला देवदुताप्रमाणे धावून येणारे नागेबाबा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे आरोग्य मित्र आहेत. त्यांनी आजवर अनेक रुग्णांना शासकीय तथा दानशूर व्यक्ती, सहकारी संस्थाद्वारे मोठी मदत मिळवून दिलेल्याने  कित्येक रुग्णांना पुनर्जीवन प्राप्त झालेले आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडू काळे यांनी श्री.गायकवाड यांचे  अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!