Friday, February 13, 2026

आदित्य नजन कडून जिजामाता विद्यालयास २५ वृक्षांची भेट

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य अण्णासाहेब नजन ह्याने २५ वृक्षांची भेट दिली.

आदित्य च्या २५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आदित्यचे वडील अण्णासाहेब नजन यांनी आपला मुलगा शिकलेल्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्याचे ठरवले.
पंचविसावा वाढदिवस असल्यामुळे पंचवीस वृक्षाचे रोपण करण्यासाठी जेसीबीने खड्डे घेऊन मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले.या सर्व वृक्षां संरक्षक क़जाळीही लावण्यात आली.
खरं तर आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल वार्मिंग यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे जगाला भेडसावणारी ही समस्या जर कुठे सोडवायची असेल तर त्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि हीच काळाची गरज अण्णासाहेब नजन यांनी ओळखली आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृक्षारोपण केले खरोखर समाजाला दिशा देणारा दिशादर्शक निर्णय अण्णासाहेब नजन यांनी घेतल्यामुळे परिसरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी बोलताना अण्णासाहेब नजन म्हणाले की, भेंडा गाव हे खूप मोठे गाव असल्यामुळे या गावातील अनेक तरुणांनी आपल्या वाढदिवसाला जर वृक्षारोपण केले तर भेंडा गाव हिरवाईने नटलेलं स्वच्छ सुंदर गाव होण्यास वेळ लागणार नाही.
जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी मुंगसे, प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे, नेवासा बाजार समितीचे माजी सभापती डॉ .शिवाजी शिंदे, डॉ. संतोष फुलारी ,सुनील वांडेकर ,अशोक पंडित, अण्णासाहेब नजन, नामदेव शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!