नेवासा
नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे जंगले कुटुंबाच्या वतीने नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांची ग्रामदैवत चंद्रागिरी महाराजांच्या दरबारात शेरनी तुला करून अर्जुन पाराजी जंगले व सौ उषा अर्जुन जंगले कुटुंबियांनी नवस पूर्ती केली.
आमदार विठ्ठलराव लंघे यांचे पानेगांव येथे आगमन होताचं फटाक्यांच्या आताषबाजीने स्वागत करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला श्रीफळ वाढवून गावातील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, पदाधिकारी यांनी हि सन्मान केला.
सरपंच सौ निकीता भोसले-आंबेकर,डॉ. जयवंतराव गुडधे,मार्केट कमीटीचे माजी संचालक जालिंदर जंगले, दत्तात्रय पोटे, शिरेगांवचे माजी सरपंच किरण जाधव, लक्ष्मण माकोणे,सागर आंबेकर,रमेश गणगे, पाराजी गुडधे,सतिश जंगले, जालिंदर जंगले,विजय जंगले, रविंद्र सोनवणे सुरेंद्र जंगले, शेतकरी संघटनेचे अशोक काळे, अच्युत जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे,बबनराव जंगले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुळाथडी परीसरातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू-आ.लंघे
मी आमदार झाल्याने पानेगांव-मांजरी येथील ग्रामदैवत चंद्रागिरी महाराजांच्या दरबारात जंगले कुटुंबाच्या वतीने शेरनी तुला केली. निकटवर्तीय पाहुणे तसेच आमचे भाची-भाचे जावई तसेच दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. मुळाथडी परीसरातील प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिल.
-आमदार विठ्ठलराव लंघे