Tuesday, March 31, 2026

नेवासा पोलिसांनी 1 लाख 28 हजारांची अवैध विदेशी दारू पकडली; वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा पोलिसांनी 01 लाख 28 हजार 496 रुपये किमतीची अवैध विदेशी दारू पकडली असून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहन व चालका विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यबाबद अधिक माहिती अशी की,आज दि. 14/06/2025 रोजी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि.पोलीस. उपअधीक्षक संतोष खाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे नेवासा ते कुकाणा रोडने वाहन क्रमांक MH 25 P 5601 यामध्ये विदेशी दारू वाहतूक होत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस स्टॉप व पंच असे नेवासा ते कुकाणा रोडवर सदर संशयित वाहनाचे रेखी करत असताना नेवासा बाजू कडून कुकाणाकडे सदर वाहन दिसले. त्यास थांबून वाहनामधील चालकास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण शामराव पाटील (वय 44 वर्ष) रा. श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर असे सांगून सदर वाहनाचे पाठीमागील शटर पंचा समक्ष उघडून पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळून आले.
सदर विदेशी दारू बाबत विचारणा केली असता चालकाने उडवा उडवी चे उत्तरे दिल्याने पंचा समक्ष सदर वाहनातील विविध कंपनीची विदेशी दारूचे एकूण 1082 बाटल्या किंमत 01 लाख 28
हजार 496 रुपये, टाटा कंपनीची जीप किंमत 01लाख 50 हजार रुपये असे एकूण किंमत 02 लाख 78 हजार 496 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे..
पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे,
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कुलबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शना खाली परी. पोलीस।उपअधीक्षक
संतोष खाडे, पोलीस हवालदार शहाजी आंधळे, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल हरी धायतडक, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!