Monday, November 10, 2025

प्रहार दिव्यांग संघटनेच्या उपोषणाला अंनिसचा पाठिंबा-विष्णु गायकवाड

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सामाजिक परिवर्तनाचे काम करणारी संघटना असून व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे अशी अंनिसची संघटनात्मक रचनाच असल्यामुळे प्रहारचे प्रणेते माजी आ. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन मिळावी या मागणीसाठी सूरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेल्या उपोषणाला जिल्हा अंनिसचा पाठिंबा असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी दिली.

दि.१४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाचे नेतृत्व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांनी केले होते. विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांना हमी भाव देणे, शेती कर्ज माफी तसेच दिव्यांगाना ६ हजार पेन्सन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार सत्तेवर येताच त्यांना याचा विसर पडला म्हणून बच्चूभाऊंना उपोषण करण्याची पाळी आली. उपोषणाच्या ६ व्या दिवशी त्यांची परिस्थिती धोकेदायक आहे. जर बच्चू भाऊंना काही कमी जास्त झाल्यास आम्ही सरकार प्रतिनिधीना रस्त्यावर फिरकू देणार नाही. हे आंदोलन अधिक तिव्र स्वरूपाचे होईल आणि त्यांची जबाबदारी सरकारवरच राहिल असा इशारा लक्ष्मणराव पोकळे यांनी यावेळी दिला.

यावेळी जिल्हा संघटक विठ्ठल गायकवाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, किशोर काजळे, जनशक्ती संघटनेचे विनोदसिंह परदेशी, प्रा. सुनिल पाखरे, पा बाबासाहेब कांबळे, बाबा ढाकणे, किशोर सुर्यवंशी,हुमायून आतार, बाळासाहेब घाडगे, पोपट शेळके, अशोक खेडकर,रोहिणी करांडे, कांचन गायकवाड, राजेंद्र जाधव, जेम्स पाळंदे, अविनाश बुधवंत, मिठूभाई शेख, संपत शिरसाठ आदी ककार्यकर्त्यांची भाषणं झाली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!