Monday, October 18, 2021

जलसाक्षरतेची जलदूत प्रणाली चिकटेची सायकल फेरी पुण्यात दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

यवतमाळ जिल्ह्यातील पूनवट गावाची कु. प्रणाली चिकटे ही 22 वर्षाची युवती जलसाक्षरतेची जलदूत बनून पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरणाचा प्रसार करण्यासाठी सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमण करीत आज पुण्यात दाखल झाली. पत्रकार भवन येथे तिने पत्रकारांशी संवाद साधला.

मागील आठ महिन्यात १०,०००किलोमीटर चा प्रवास केला आहे. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, पर्यावरणप्रेमी दिलीप कुलकर्णी (कुडावळे ), राज्याचे जलसाक्षरता केंद्र यातून प्रेरणा घेतल्याचे तिने सांगितले

सर्व जलदूत, जलप्रेमी,जलनायक जलयोद्धा आणि जिल्हा जलसाक्षरता समिती पुणे यांनी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. सुमंत पांडे,रमाकांत बापू ,विनोद बोधनकर जलनायक राधिका कुलकर्णी तसेच चारुता कडूरकर, सतीश खाडे उपस्थित होते.

प्रणाली चिकटे म्हणाली, ‘ माझ्या सायकल भ्रमंतीचा उद्देश पर्यावरण संवर्धन,जलसाक्षरता, महिला सशक्तीकरण जनजागृती आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास हा आहे.सभोवताली, दिवसेंदिवस बदलती भोगवादी जीवनशैली, वाढते मानसिक प्रदूषण त्यातून निर्माण होणारे वातावरणीय प्रदूषण, तापमानवाढ, वातावरणबदल, ऋतुचक्रबदल या बदलाच्या परिणामातुन निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजेत.
सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व तळाळात काम करणारी व्यक्ती यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे हेही उद्देश आहेत.

हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे. मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असुन, प्रवास हा माझा व्यक्तिगत आहे कुठल्याही शासकीय किंवा संस्थेमार्फत निघाली नसून, सोबत, कोणाचीही प्रवासाला स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत आर्थिक सहकार्य सुद्धा लोकच करतात.

प्रवास करत 8 महिने जास्त झाले. 10,000 (हजार) कि. मी. पेक्षा जास्त चा प्रवास 23 जिल्हयांचा झाला आहे, असेही प्रणालीने सांगितले.
प्रवासात लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. अशा कोविडच्या काळातसुद्धा सहकार्य मिळत आहे. सोबत पर्यावरण हा विषय सर्वांच्या जाणिवेचा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पोलीस वर्ग सुद्धा सहकार्य करीत आहे. त्यामुळे प्रवास सुरक्षितरीत्या सुरू आहे. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे, असेही तिने सांगितले.

 

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!