नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरपंच पदाचे आरक्षण सन २०२५ ते २०३० करिता चक्रानुक्रमे (रोटेशन) पध्दतीने आरक्षित करावयाचे आहे. याकरिता विशेष सभा गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे दिली.
या प्रसिद्ध पत्रकात म्हंटले आहे की,
जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील पत्रा अन्वये जनगणना २०११ च्या आधारे नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरपंच पदाचे आरक्षण सन २०२५ ते २०३० करिता चक्रानुक्रमे (रोटेशन) पध्दतीने आरक्षित करावयाचे आहे. याकरिता विशेष सभा दि.२४/०७/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता व एक दवितीयांश सरपंच पदे महिला (अनुसुचित जाती महिला व अनुसुचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी दि.२४/०७/२०२५ रोजी दुपारी १ वाजता उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर भाग, अहिल्यानगर यांचे हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय नेवासा येथे आरक्षण सोडत आयोजित केलेली आहे. संबधित सर्वानी उपस्थित रहावे,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.