Sunday, March 29, 2026

वृक्ष लागवडीने पर्यावरण संरक्षणा बरोबरच जंगली प्राण्यांनाही निवारा मिळेल-कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे/सुखदेव फुलारी

“वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या आस्थापनांमधील कामगार एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच जंगली प्राण्यांनाही निवारा मिळत आहे,” असे मत कामगार कल्याण आयुक्त श्री.रविराज इळवे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, राजगुरुनगर कामगार कृती समिती, साद फाउंडेशन आणि खान्देश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२० जुलै रोजी तिन्हेवाडी (राजगुरुनगर, ता.खेड) येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्हेवाडी जिल्हा परिषद शाळा व त्रिमूर्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर त्रिलोकेश्वर महादेव मंदिराजवळील गायरान क्षेत्रात पिंपळ, जांभूळ, चिंच, हिरडा, कडुलिंब, कांचन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या २०० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी श्रीमती सुजाता इळवे, पुणे विभागाचे प्रभारी साहाय्यक कल्याण आयुक्त श्री.मनोज पाटील, तिन्हेवाडीच्या सरपंच श्रीमती प्रतीक्षा संतोष पाचारणे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.दत्तात्रेय येळवंडे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सीईओ श्री.दिलीप बटवाल, सी.आय.इंडिया गिअर चाकणचे श्री.अरविंद साहू, कामगार भूषण श्री.गणेश वाघ, मंडळाचे विभागीय अधिकारी व कर्मचारी श्री.उद्धव रामसाने, श्री.संजय थोरात, श्री.संदीप गावडे, श्री.प्रदीप बोरसे, श्री.सुहास माने, राजगुरुनगर लॉ कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी, गुणवंत कामगार व कामगार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजगुरुनगर कामगार कृती समिती व साद फाउंडेशनच्यावतीने श्री.इळवे यांचा सत्कार करून मानपत्र देण्यात आले. तसेच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल साद फाउंडेशनचे श्री.दत्तात्रय दगडे व श्री.साखरचंद लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजगुरुनगर कामगार कृती समितीचे अध्यक्ष श्री.सदाशिव आमराळे, उपाध्यक्ष श्री.दत्तात्रय दगडे, श्री.भरत उढाणे, श्री.रामदास सैंदाणे, श्री.नागेश दळवी, श्री.बाबासाहेब वाणी, श्री.प्रकाश पटारे, श्री.अविनाश वाडेकर, श्री.कमलेश गावडे, श्री.तानाजी पाचारणे, श्री. शंकर नाणेकर, श्री. गोकुळ भामरे, श्री. दीपक निकुमे, श्री. ललित जाधव, श्री. प्रकाश वीर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सदाशिव आमराळे यांनी सूत्रसंचालन श्री.भरत उढाणे यांनी तर आभार प्रदर्शन चाकण कल्याण केंद्राचे संचालक श्री.अविनाश राऊत यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!