Monday, October 25, 2021

आता पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर 100 टक्के इथेनॉलवर धावतील वाहने

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दीर्घकालीन कालावधीत 100 टक्के इथेनॉलवर गाडी चालवण्याचे सरकारचे लक्ष्य असून, वर्ष 2023-24 पर्यंत सरकारने 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे टार्गेट ठेवले आहे, असे उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले. गोयल म्हणाले की, बॅटरी तंत्रज्ञानाची मागणी येत्या काही दिवसांत लक्षणीय वाढणार आहे.

रिन्यूएबल सेक्टर बरीच प्रगती होईल, ज्यामुळे बॅटरी उद्योगाचा देखील विकास होईल. आयोजित आत्मनिर्भर भारत परिषदेला संबोधित करताना पीयूष गोयल म्हणाले की, रिन्यएबल ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू, ज्याच्या मदतीने पेट्रोलऐवजी 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावतील.

ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे त्यांना आवाहन आहे की त्यांनी केवळ सौर उर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जीच्या मदतीने आपली कार रिचार्ज करावी. यासाठी भविष्यात चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.

तत्पूर्वी सरकारने 2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष्य पाच वर्षांपूर्वी शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या देशात पेट्रोलमध्ये जवळपास 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. वर्ष 2014 मध्ये ते केवळ 1-1.5 टक्क्यांच्या दरम्यान होते.

रिन्यूएबल एनर्जीमध्ये 250 टक्के वाढ

रिन्यूएबल एनर्जीच्या वापराबद्दल भारत खूप जागरूक आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यात 250 टक्के वाढ झाली आहे. भारत जगातील अशा पाच देशांमध्ये आहे जिथे रिन्यूएबल एनर्जीचा सर्वाधिक वापर केला जात आहे. हवामान बदल परफॉर्मन्स इंडेक्समध्येही पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अर्थव्यवस्था व पर्यावरणाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!