नेवासा
प्रहार जनशक्ति पक्षाचे वतीने शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी।सकाळी १:३० ते १०:३० या वेळेत नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांनी दिली.
या बाबद नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. प्रहारचे संस्थापक माजी मंत्री
बच्चुभाऊ कडू यांचे नेतृत्वात शेतकरी कर्जमाफी तत्काळ जाहीर करावी, सातबारा कोरा आदेशांची अंमलबजावणी करावी,इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात तसेच शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात शांततेच्या मार्गाने
गुरुवार दि.२४ जुलै २०२५ रोजी सकाळी १:३० ते १०:३० या वेळेत फक्त १ तास चक्काजाम करण्यात येईल.
शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार आदिनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे,जिल्हा युवक अध्यक्ष अड.पांडुरंग औताडे,जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब खर्जुले आदिनी।केले आहे.