Saturday, August 2, 2025

नेवासा तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील 114 पैकी 88 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडत गुरुवार दि.24 जुलै रोजी नेवासा तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये नगर विभागाचे उपविभागीय  अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी नागरिकांच्या उपस्थितीत ही सोडत घेतली.

नेवासा तालुक्यात एकूण 88 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती व्यक्ती करिता 7 तर महिलेकरिता 6 पदे, अनुसूचित जमाती व्यक्ती करिता 3 तर महिले करिता 4 पदे, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती करिता 13 तर महिले करिता 11 पदे, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती करिता 24 तर महिले करिता 20 पदे आरक्षित करण्यात आले आहे.88 पैकी 41 पदे महिलांकरिता राखीव आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत खालीलप्रमाणे…

*अनुसूचित जाती व्यक्ती राखीव(7)
1) अमळनेर 
2) शहापूर 
3) गोणेगाव 
4) लांडेवाडी 
5) शिंगणापूर 
6) बेल्हेकरवाडी
7) मुकिंदपुर

*अनुसूचित जाती स्त्री राखीव(6)
1)मांडेगव्हाण
2) रामडोह
3) बऱ्हाणपूर
4) खुणेगाव
5) सुरेगाव गंगा
6) उस्थळ खालसा

अनुसूचित जमाती स्री राखीव(4)
1)वाटापुर
2) निंभारी
3) जळके बुद्रुक
4) कारेगाव

*अनुसूचित जमाती व्यक्ति करिता आरक्षण(3)
1) जैनपुर
2) गोंडेगाव
3) पानेगाव

* नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री राखीव(12)
1) भेंडा बुद्रुक
2) देडगाव
3) दिघी
4) खडका
5) कुकाणा
6) मंगळापुर
7) नारायणवाडी
8) घोगरगाव
9) खुपटी
10) भानस हिवरे
11) खेडले परमानंद

*नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती साठी आरक्षित(12)
1)रस्तापूर
2)गोधेगाव
3)भालगाव
4) फत्तेपुर
5) कांगोनी
6) मुरमे
7) निपाणी निमगाव
8) नविन चांदगाव
9) चिंचबन
10) नागपुर
11) जळके बुद्रुक
12) भेंडे खुर्द
13) करजगाव

*सर्वसाधारण स्त्री राखीव(20)
1) सुलतानपूर
2) तरवडी
3) टोका
4) पाचुंदे
5) सोनई
6) शिरेगाव
7) उस्थळ दुमाला
8) शिंगवे तुकाई
9) माका
10) पाचेगाव
11) बेलपिंपळगाव
12) वरखेड
13) वाकडी
14) चांदा
15) खरवंडी
16) नजिक चिंचोली
17) बहिरवाडी
18) माळीचिंचोरा
19) कौठा
20) वडाला बहिरोबा

*सर्वसाधारण व्यक्ती साठी आरक्षित(24)
1)) रांजणगाव
2) सलाबतपुर
3)जैऊरहैबती
4)सौदाळा
5)पुनतगाव
6)तामसवाडी
7) बाभुलखेडे
8)बकूपिंपळगाव
9) देवगाव
10)देवसडे
11)गळनिंब
12) गेवराई
13) हंडीनिमगाव
14) हिंगोनी
15) मक्तापूर
16) लोहगाव
17) म्हालसपिंपळगाव
18) मोरयाचिंचोरे
19) पिचडगाव
20) प्रवरासंगम
21) सुरेशनगर
22) तेलकुडगांव
23) वांजोळी
24) पिंप्रीशहाळी

दरम्यान नेवासा तालुक्यात एकूण 114 ग्रामपंचायती असून त्यापैकी 26 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी जानेवारी 2021 मध्ये आरक्षण काढण्यात आलेले आहे, सदर आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.

जानेवारी 2021 मध्ये आरक्षण निश्चित झालेल्या 26 ग्रामपंचायती

▶अनुसूचित जाती (5):- सुकळी खुर्द, खेडलेकाजळी, खामगाव, धनगरवाडी, गोमळवाडी

*अनुसूचित जमाती (2):- गिडेगाव व गोगलगाव.

*नागरिकांचा मागास प्रवर्ग (7):- पाथरवाला, गोपाळपूर, अंतरवाली, नांदूरशिकारी, लोहारवाडी, शिरसगाव, गणेशवाडी.

*खुला प्रवर्ग (12):- बेलपांढरी, चिलेखनवाडी, घोडेगाव, जायगुडे आखाडा, लेकुरवाळेआखाडा, महालक्ष्मी हिवरे, नेवासा बुद्रुक, राजेगाव, तामसवाडी, बडुले, वंजारवाडी, झापवाडी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!