Saturday, August 2, 2025

अहिल्यानगर जिल्हा परिषदेला ४ लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करिता १ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेला ४ लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने याबाबद दि.२८ जुलै, २०२५ शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.त्यात म्हंटले आहे की, राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण २१.२५ टक्के आहे. जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतूबदल याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड हाती घेण्याचे महत्व वैश्विक स्तरावर मान्य झालेले आहे. राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करीता १० कोटी वृक्ष लागवड मोहिम लोक चळवळ म्हणून राबविण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी दि.०४.०६.२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये निर्देशित केले आहे. १० कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने १० टक्के अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन विचारात घेऊन ग्रामविकास विभागासाठी एकूण १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महसूल व वन विभागाने निश्चित केले आहे. त्यानुषंगाने ग्रामविकास विभागांतर्गत “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानासाठी वर्ष २०२५ करीता १ कोटी वृक्ष लागवड मोहिम जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याची बाब प्रस्तावित आहे.

त्यानुसार राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानासाठी वर्ष २०२५ करीता १ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन विचारात घेऊन प्रत्येक जिल्हा परिषद निहाय वृक्ष लागवडीचे उद्दीष्टे खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे…

१)अकोला(१९१४००),२)अमरावती(२५१०००),३)अहिल्यानगर(४७४०००),
४)कोल्हापूर(४०५०००),५)गडचिरोली
(१६२१००),६)गोंदिया(१५४४००)
७) चंद्रपूर (२१३६००),८) छ. संभाजीनगर(३११८००),९)जळगांव
(३५४३००),१०)जालना(३१८९००),
११) ठाणे(१५४३००),१२)धाराशिव
(२६२७००),१३) धुळे(१९९८००),
१४) नंदूरबार (१८९१००),१५) नांदेड
(४६९०००),१६) नागपूर(२७३९००),
१७) नाशिक (४९६९००),१८) परभणी
(२६२०००),१९) पालघर(१६७५००),
२०) पुणे (४९६५००),२१) बीड(३७०५००),२२) बुलढाणा (३५१५००),२३)भंडारा(१९३१००),
२४) यवतमाळ (४३०३००),२५) रत्नागिरी (३०३२००),२६) रायगड
(२५०३००),२७) लातूर (३२१४००),
२८) वर्धा(१८६५००),२९)वाशिम
(१९५८००),३०) सांगली(३४९२००),
३१) सातारा(४६५२००),३२)सिंधुदुर्ग
(१५४२००),३३) सोलापूर (३९७०००),
३४) हिंगोली(२२१६००) एकूण १ कोटी वृक्ष लागवड.

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्ह्याचे नोडल अधिकारी असतील.
सन २०२५ या वर्षासाठी वृक्षांची लागवड करण्यासाठी अशासकीय संस्थांमार्फत रोपे उपलब्ध करुन घेण्यात यावीत. सर्व जिल्हापरिषदांनी त्यांच्यां अंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायती यांच्या मार्फत वृक्ष लागवड करण्याची कार्यवाही करावी. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना विशिष्ट उद्दिष्ट देवून त्याप्रमाणे वृक्ष लागवड नियोजित करणे आवश्यक आहे. वृक्षारोपण करताना प्रामुख्याने त्या-त्या भागामधील भौगोलीक परिस्थिती विचारात घेऊन त्या भागात वाढ होऊ शकणाऱ्या स्थानिक प्रजातींची प्राधान्याने लागवड करावी.
विभागामार्फत करण्यात येणारी वृक्ष लागवड विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जमीनीवर करण्यात यावी. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांच्या कार्यालये तसेच जिल्हा परिषद मालकीच्या जागांवर सदरचे वृक्ष लागवड करण्याची कार्यवाही करावी.
महसुल व वन विभागाच्या दि. ११.०६.२०२५ च्या शासन निर्णयात नमूद सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!