नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा पतसंस्थेचे आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भेंडा येथे ज्ञानेश्वर महाराज सबलस (वडूलेकर) यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय व विशेष कल्याण विभागाच्या वतीने
सन २०२३-२४ या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे.त्याबाबद्द
श्रीसंत नागेबाबा, संत शिरोमणी सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त नागेबाबा परिवार व नागेबाबा देवस्थानचे वतीने दि.२३ जुलै रोजी आयोजित कीर्तन सेवेच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर महाराज सबलस (वडुलेकर) यांचे हस्ते श्री.गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड व सर्व विश्वस्त, भाविक यावेळी उपस्थित होते.