नेवासा, दि. ८
नेवासा येथे १ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
नवीन इमारत सर्व सुविधायुक्त असून यामुळे नागरिकांना नोंदणीशी संबंधित सेवा ऑनलाईन स्वरूपात सुलभपणे व तत्परतेने मिळणार आहेत. जनतेला तांत्रिक अडथळ्यांशिवाय सेवा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा कार्यक्षम ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
उद्घाटन प्रसंगी आमदार विठ्ठल लंघे पाटील, सह जिल्हा निबंधक महेंद्र महाबरे, तहसीलदार संजय बिरादार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.