नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामसभा ही मानव अधिकार संरक्षण समिती स्थापन करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामसभा ठरली आहे.
सौंदाळा ग्रामपंचायतीच्या दि.१४ ऑगस्टच्या ग्रामसभेत ग्रामीण मानव अधिकार संरक्षण समिती स्थापन करण्याचा संकल्प करून ठरावानुसार ही समिती मानवी हक्क उल्लंगणाशी संबंधित तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्य मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करेल. सौंदाळा ग्रामसभा ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामसभा ठरली आहे, जीने गाव पातळीवर मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन केली.
यबाबद अधिक माहिती देताना सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले की,
राज्य मानवअधिकार आयोगाच्या चौकटीत ग्रामीण भागात अशा समित्या स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले.ठरावानुसार समिती मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित तक्रारीची निराकरण करण्यासाठी हक्क आणि कर्तव्याबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी आणि कायदेशीर उपाय कसे मिळवायचे याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करेल. निवडलेले प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते महिला शिक्षक अपंग व्यक्तींसह ११ सदस्यांचा समावेश असलेले सदस्य पोलिस आणि इतर एजन्सीशी सहकार्य करून उल्लंघनाचे निराकरण करेल आणि सुधार आवश्यक उपाययोजनांची शिफारस करेल.
ठरावानुसार सरपंच अध्यक्ष म्हणून काम करतील तर तर गावात मानवी हक्क संरक्षणाचे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षण घेणे जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधने हे या ठरावात समितीला बंधनकारक आहे.ग्रामसभा या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तळागाळातील लोकशाही संस्था आहेत. ज्या मानवी संरक्षणास प्रोत्साहन देऊन पंचायतीचे प्रभावी कामकाज सुचित करतात प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी मध्ये लोकांचा सहभाग वाढवणे अशी कर्तव्य ग्रामसभेत अपेक्षित आहेत.
*सौंदाळा गावची ग्रामस्तर मानवाधिकार समिति अशी….
*अध्यक्ष-सरपंच शरद बाबुराव आरगडे
*सचिव-श्रीमती प्रातिभा गोरक्षनाथ पिसोटे (ग्रामपंचायत अधिकारी)
*सदस्य- श्री.मोसीम अस्लीम सय्यद (अल्पसंख्याक प्रतिनिधी), श्रीमती सिंधुबाई भगवान आरगडे (विधवा प्रतिनिधी),श्री.बाबासाहेब माछिंद्र बोधक (अनुसूचित जाती प्रतिनिधी),सौ.सुमन भीमराज आढागळे (अनुसूचित जाती महिला प्रतिनिधी),
श्री.संभाजी कारभारी आरगडे (सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी),श्रीमती.भामाबाई काशीनाथ झावरे(सेवा निवृत्त शिक्षिका प्रतिनिधी),
चि.अमोल भाऊसाहेब आरगडे (युवक प्रतिनिधी),कु.सितल सुनील आरगडे (युवती प्रतिनिधी),सौ.कविता भाऊसाहेब आढागळे (दिव्यांग प्रतिनिधी).