नेवासा
नेवासा फाटा परिसरातील फर्निचरच्या दुकानाला विजेचे शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रि घडली.
नेवासा फाटा कॉलेज परिसरामध्ये असलेले अरुण रासने यांच्या कालिका फर्निचरच्या दुकानाला रात्री १ वाजता लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये मयूर अरुण रासने (वय 36 वर्षे),पायल मयूर रासने (वय 30 वर्षे), अंश मयूर रासने (वय 11 वर्षे),चैतन्य मयूर रासने (वय 6 वर्षे) ,आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85 वर्षे) यांचा गुदमरून मृत्यू झाला. अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेल्यामुळे दोघेही वाचले.