नेवासा:श्रीकृष्ण जयंती व गोपाळ काल्या निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे जागृत तीर्थक्षेत्र शिनाई देवस्थानमध्ये दि.१५ शुक्रवार रोजी सकाळी पाच वाजता मठाधीपती श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालबम्हचारी महंत आवेराज महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजा व महाआरती दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांना शाबुदाना फराळाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला .
त्यानंतर रात्री 9.30 ते11.30 वाजेपर्यंत महंत गिरीशराज शास्त्री बाबा यांचे जन्मावर किर्तन झाले त्यानंतर रात्री ठिक बारा वाजता गुरुवर्य बाबाजी महंत आवेराज महाराज , किशोर भाऊ जोजार, कचरू ढेरे साहेब, सुशील जैन, सौ. विमलताई सुभाषशेट जैन,ओंकार पाठक, अंबादास सरोदे , डॉ. सुरेश बेल्हेकर , अत्माराम घोरपडे, देवीदास साळुंके, कमलेश ओत्सवाल, बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते महाअभिषेक तद्नंतर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत देवाच्या पाळण्याची दोरी ओढून भव्य दिव्य स्वरूपात जन्मोत्सव लाह्या सुंटुडा महाप्रसाद वाटप करुण पार पडला.
तसेच दि. 16 शनिवार रोजी सकाळी 9 ते 11.30 गावातून देवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक गावातील सर्वच मंडळांच्या दहिहंड्या फोडून मिरवणूक देवस्थान महाद्वारात आली दुपारी ठिक 12 वाजता मानाची काल्याची दहिहंडी श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज यांच्या हस्ते व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत फोडण्यात आली तद्नंतर सर्व भाविक भक्तांना देवस्थान तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाला महंत गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज देवगड संस्थान यांनी सदिच्छा भेट दिली. वेळी महंत विलासराज बाबाजी परांडेकर, महंत रमेशानंदगीरी महाराज, महंत सुधाकर बाबाजी येळमकर, महंत गोपाल गीरी महाराज, महंत तुषारबाबा सातारकर,महंत ऋषीनाथ महाराज, महंत धनंजय बाबाजी अंकुळनेरकर,ह.भ.प. लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,ह.भ.प. गंगाधर महाराज गाडेकर, ह.भ.प. माऊली महाराज हजारे ,नेवासा पोलीस स्टेशनचे श्री ससाणे व त्यांची टिम, तसेच राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी दोन दिवसांत दर्शन घेऊन कार्यक्रमाला भेटी दिल्या त्या प्रसंगी शिनाई संतसेवक मंडळ पंचक्राषीतील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी परिश्रम घेतले व त्या वेळी देवस्थान तर्फे उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज यांनी सर्व उपस्थीत भाविक भक्तांचे आभार मानले.