Monday, September 1, 2025

पद आणि अधिकाराच्या माध्यमातून पाटेकरांनी समाज व शेतकऱ्यांची सेवा केली-स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

पद आणि अधिकार हा जनतेच्या सेवेकरीचा आहे त्याचे भान ठेवून सुरेश पाटेकर यांनी समाजाची व शेतकऱ्यांची खूप चांगली सेवा केल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले

नेवासा पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर हे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे आयोजित  सेवापुर्ती कृतज्ञता कार्यक्रमात स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज बोलत होते. शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार संभाजीराव फाटके,अड.शिवाजीराव काकडे,काकासाहेब शिंदे, सामान्य प्रशासन विभगाचे अवर सचिव अशोकराव चेमटे, शिक्षण सहसंचालक दिनकरराव टेमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, श्री.सुरेश पाटेकर व सौ.मंगल पाटेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वामी प्रकाशानंदगिरी पुढे म्हणाले की,
पदाच्या माध्यमातून समाजाची,शेतकरी बांधवांची सेवा करता आली याचे समाधान तर सेवापुर्तीनंतर त्या सेवेला पूर्णविराम मिळेल याचे दुःखही पाटेकर साहेबांना असेल. पद आणि अधिकार हे जनतेचे सेवेकरीता आहेत. जबाबदारीने राष्ट्रहित आणि देशहीत म्हणून केलेली सेवा आदर्श सेवा ठरते.

आ.मोनिकाताई राजळे म्हणाल्या,
पंचायत राज’ या संकल्पनेचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतून पाटेकर साहेबांच्या सेवेला सुरुवात झाली आणि आज माऊलींच्या भूमीत निवृत्त झाले.पाटेकर साहेबांनी निवृत्तीनतंर प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्याचे सेवेत योगदान द्यावे.

आ.विठ्ठलराव लंघे म्हणाले, पाटेकर हे सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. काम करतांना पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना बरोबर घ्यावे लागते.अधिकारी-पदाधिकारी ही विकास रथाची दोन चाके आहेत.राजकारणात रिटायरमेंटची अट नाही आणि प्रमोशनची मात्र शास्वती नाही,त्यामुळे पाटेकरांनी राजकारणात न येता सामाजिक कार्यात यावे असा सल्ला आ.लंघे यांनी दिला.

माजी आ.चंद्रशेखर घुले म्हणाले, पाटेकर यांनी ३३ वर्षे निष्ककलंक सेवा केली.त्यांनी त्यांच्या अनुभवाचा समजासाठी योगदान द्यावे.

माजी आ.अभंग म्हणाले, पाटेकर यांचा कर्तृत्ववान अधिकारी म्हणून लौकिक
आहे. ५८ वर्षे झाले म्हणजे मानुस थकत नाही,त्यांनी आयुष्यभर कार्यरत रहावे. मी आणि माझ विसरून यापुढे समाजाचे काम करावे.

गटविकास अधिकारी संजय लखवाल म्हणाले, पाटेकर हे मितभाषी स्वभावाचे प्रचंड जनसंपर्क असलेला अधिकारी आहे.

सुरेश पाटेकर सेवपूर्ती सत्काराला उत्तर देताना श्री.पाटेकर म्हणाले की,मी आनंदाने व समाधानाने सेवानिवृत्त होत आहे. ३३ वर्षाचे सेवेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि जनतेचे खूप प्रेम मिळाले. सकारात्मक दृष्टिकोण ठेवून समजासाठी विधायक काम केले आणि यापुढे ही करणार आहे. जनहित साधायचे असेल तर लोकप्रतिनिधिंनी नाही आणि अधिकाऱ्याने होय म्हणायला शिकले पाहिजे.

माजी आ.संभाजीराव फाटके,अड.शिवाजीराव काकडे,दिनकर गर्जे,दत्तात्रय खाटिक, बाळासाहेब धोंडे, संजय लाखवाल, डॉ.बापूसाहेब नागरगोजे,दिनकरराव टेमकर, यवला पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र काले यांनी ही मनोगत व्यक्त करून श्री.पाटेकर यांच्या कामाचे कौतुक केले.

ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे,बबनराव भुसारी,अंबादास कळमकर, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती देविदास पाटेकर, नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,कॉम.बाबा आरगडे,बापूसाहेब भोसले,अंकुशराव काळे,विजयाताई अंबाडे, पी.आर.जाधव, भिवाजी आघाव, डॉ.शिवाजी शिंदे,अशोकराव वायकर, भाऊसाहेब सावंत,नामदेव शिंदे, सोमनाथ कचरे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ.रेवनाथ पवार व गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.आंनद पाटेकर यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!