नेवासा/प्रतिनिधी
सावता परिषद युवक आघाडी उत्तर जिल्हाध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील विजय भाऊसाहेब चौधरी यांची तर करजगाव येथील रामेश्वर अशोक पुंड यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र सावता परिषद युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाडेकर यांनी दिले.
नियुक्ती पत्रात म्हंटले आहे की,सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रभारी मयूर वैद्य, प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष राहुल जावळे, प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे, कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे, संतोष राजगुरू, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ. मनीषाताई सोनमाळी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुलसौंदर यांच्या सहकार्यांने सावता परिषद अहिल्यानगर उत्तर विभाग युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी व कार्याध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
माळी समाजाच्या हिताच्या व अस्मितेच्या प्रश्नासोबतच समाजाच्या सर्वांगिण ऊत्कर्षासाठी सावता परिषदेच्या ध्येय धोरणानुसार कार्यरत राहून सावता परिषदेच्या कार्याचे जाळे महाराष्ट्रात सर्वत्र विणून संघटनेचा विस्तार वाढविणे काम करावे.