नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित वकिलराव लंघे पाटील माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसगाव येथे मंगळवार पासून सुरू झालेल्या नेवासा तालुका पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धाकरिता प्रा. गणेश देशमुख यांच्याकडून ५३ खेळाडूंना २५ हजार रूपयांचे स्पोर्ट कीटचे वाटप विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब धनवटे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रा.देशमुख म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर व राज्यस्तर निवड होईल, त्याचा पुढील सर्व खर्च ते स्वतः करतील.
तसेच अमोल पोटे, शाम देशमुख व अमित मोहिते या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात चार सीसीटीव्ही कॅमरे देण्याचे जाहीर केले. दिलीप पोटे यांनी विद्यालयात चार हायमॅक्स लाईट व सर्व ग्राउंडवर लाल माती देण्यास जाहीर केले आहे.
या सर्व माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब धनवटे यांनी सन्मान केला. नितीन देशमुख ,बाळासाहेब देशमुख,घावटे ,हरिभाऊ आगळे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.