शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथील प्रा.आप्पासाहेब कारभारी खंडागळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून २०२५ मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पात्रता (सेट) परीक्षेमध्ये ‘हिंदी’ विषयात उत्तीर्ण झाले आहेत.मागील वर्षी ते ‘राज्यशास्त्र’ या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
श्री. खंडागळे हे सध्या जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला पाऊलदौना ता.सालेकसा जि.गोंदिया येथे कार्यरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे माजी आ.डॉ नरेंद्र घुले पाटील, माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितीज घुले पाटील, श्री.के.वाय.नजन , डॉ.शरद कोलते,प्राचार्य सुनिल शिंदे,प्राचार्य सुरेश शेरे,उप प्राचार्य डॉ.रमेश खैरे, पर्यवेक्षक नांगरे,डॉ.निलेश खरात, मुख्याध्यापक श्री.राजेश वट्टी,ग्रामस्थ,सर्व मित्र परिवार,सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.