गुहा: पत्रकार राहुल कोळसे:अहमदनगर जिल्हा क्रीडा व युवा संचालनालय मार्फत घेण्यात आलेल्या राहुरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय टाकळीमिया येथे करण्यात आले होते .या स्पर्धेसाठी तालुक्यातील सुमारे 33 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते .या सर्व 33 शाळेच्या 14 वर्षे वयोगटाच्या सर्व संघांना मात देत गुहा येथील ज्ञानवर्धिनी शाळेच्या 14 वर्षे वयोगटाच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून सलग तिसऱ्यांदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून हॅट्रिक मारली आहे. द्वितीय क्रमांक मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आगरेवाडी हा संघ विजय झाला आहे. विशेष खेळाडू म्हणून कार्तिक अरगडे व साई कोळसे यांनी समोरच्या संघावर मात करत विजय ज्ञानवर्धिनी शाळेच्या खेळाडूंनी खेचून आणला.
क्रीडा शिक्षक सौरभ वरखडे सर यांचे विशेष व मेहनतीचे मार्गदर्शन मिळाले आहे. सर्व पालक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षकांच्या वतीने खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. शाळेचे संस्थापक ज्ञानदेव शेलार , सेक्रेटरी मनीषा शेलार ,उपाध्यक्ष संभाजी हराळ, संचालक मेजर चंद्रकांत सौदागर या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचार्य औदुंबर कडू ,उपप्राचार्य अरुण पारखे, कोऑर्डिनेटर अमोल तोडमल, अर्जुन मुसमाडे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले.आपल्या शाळेचा 14 वर्षे वयोगटातील कबड्डी संघ राहुरी तालुक्याचे नेतृत्व करणार असून जिल्हास्तरासाठी कबड्डी स्पर्धेसाठी मानकरी ठरला आहे.




