नेवासा/सुखदेव फुलारी
अब्दुल शेख यांच्या पाठीशी उभे रहा, सेवा करण्याची संधी द्या, तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेचा सर्वांगीण विकसाचा ध्यास घेतलेला पक्ष आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
व प्रवक्ते अविनाश आदिक यांनी केले.
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे श्री.आदिक यांच्या घरेलू महिला कामगार महिलांना विशेष कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी श्री. बोलत होते.
युवानेते अब्दुलभैय्या शेख म्हणाले की, महिला भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया मार्फत सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे,उपाध्यक्ष वसंतराव कांगुणे,
विराट प्रतिष्ठानचे निलेश सरोदे,
सरपंच किशोर गारुळे,सुरेशराव डिके,
बाबासाहेब नवथर,संदीप लष्करे,अभय तुवर,संभाजी जाधव,चंद्रशेखर गटकळ,सर्पमित्र पुरुषोत्तम चिंधे,कृष्णा शिंदे,प्रा. किशोर गटकळ,अनिल पुंड,भारत चौघुले,संजय वाघमारे,राहुल कांगुणे,बेलपिंपलगाव शाखाध्यक्ष राजेंद्र धिरडे, प्रा.गणेश चौघुले, प्रा. अशोक गाडे आदि उपस्थित होते.




