नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे अज्ञात वाहनाचे धडकेने रस्ता अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी सकाळी बिबट्या मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. प्रथमदर्शनी रोड अपघातात सदर बिबट्याचा मृत्यू झालेला दिसून येत असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शव विच्छेदन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली होती.
त्यांनतर नेवासाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड, सलाबतपुरचे पशुधन विकास अधिकारी डॉ.शरद अवताडे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. वाहनाचे धडक दिल्याने अंतर्गत रक्तस्रावाने मृत्यु झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी व वन अधिकाऱ्यांनी दिली.

वनपरिमंडल अधिकारी वैभव गाडवे, वनरक्षक दामोदर धुळे, वनरक्षक राहुल शिसोदे, वन कर्मचारी सयाजी मोरे यांचे उपस्थितित मृत बिबट्याचे नेवासा फाट्यावरील माहिती केंद्र (काष्टकुटी) येथे अग्नी दहन करण्यात आले.




