नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील तरवडी गावचे सुपूत्र आकाश भारस्कर याची केंद्रीय पोलीस दल उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकार (एसएससी) मार्फत २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय पोलीस दल,दिल्ली (सीपीओ) परीक्षेमध्ये आकाश कैलास भारस्कर यांची उपनिरीक्षक म्हणून नुकतीच निवड झाली. यापुर्वी तो भारतीय डाक विभाग,अहिल्यानगर मुख्य डाकघर येथून पदोन्नती घेऊन मुंबई येथे कार्यरत होता.
गोगलगाव येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सुदामराव मते पाटीलल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास दौलत भारस्कर यांचा आकाश हा चिरंजीव आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, विश्वस्त माजी आ.पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले पाटील, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे,प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे व संस्थेचे सर्व मुख्याध्यापक यांनी त्याच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.त्याच बरोबर परिसरातून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.




