नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात लाडकी बहीण योजनेसह अनेक शासकीय योजना घरोघरी पोहचवून त्या प्रभावीपणे राबविणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या घरी शेकडो महिलांनी भेट देत दिवाळी भाऊबीजे निमित्त ओवाळणी केली. त्यांनी कुकाणा आणि परिसरातील सर्वधर्मीय माताभगिनींमध्ये विश्वास व आत्मीयतेचा पूल बांधल्याचे चित्र यानिमित्ताने पहावयास मिळाले.
कुकाणा येथे अब्दुल भैय्यांच्या घरी दिवाळी भाऊबीज साजरी करण्यात आली. शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे भेट देत ओवाळणी केली.यामुळे दिवाळी सणाची शोभा अनेकपटींनी वाढली. अब्दुलभैय्यांचे समाजसेवेतील योगदान,स्थानिक महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.
अब्दुल भैय्या यांच्या सेवाभावी कार्यामुळे ते आज नेवासातील सर्वांच्या मनातील “लाडके भाऊ” बनले आहेत.
यावेळी बोलताना अब्दुल भैय्या म्हणाले की, मी सदैव माझ्या भगिनींच्या सेवेसाठी तत्पर राहीन. तुमच्या प्रेमाने व आशीर्वादांनीच माझ्या कार्याला नवी प्रेरणा मिळते.
यास्मिन शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.




