नेवासा/प्रतिनिधी
जायकवाडी प्रकल्पांतर्गत नेवासा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमध्ये पुरवावयाच्या नागरी सुविधा कामांच्या
४ कोटी ०४ लाख ९७ हजार ४६९ रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत होते, त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून ४ कोटी ०४ लाख ९७ हजार ४६९ रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दि.२८ ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून त्यात
जायकवाडी प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणातील पुढील तक्त्यात नमूद नागरी सुविधा कामास कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांची तसेच अधीक्षक अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांची तांत्रिक मान्यता घेण्याच्या अधीन राहून एकूण रूपये ४ कोटी ०४ लाख ९७ हजार ४६९ रुपये रकमेच्या ०५ नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.
यात
१) गळनिंब येथील कोठेश्वर मंदिर ते मंगळापूर शिव रस्ता सा.क्र.०/०० ते १/२५० मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ९० लाख ५० हजार ६६० रुपये.
२) गोपाळपूर ते जूने खामगाव (बॅकवॉटर) रस्ता सा.क्र.०/०० ते १/५०० मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी ९५ हजार ५०९ रुपये.
३) रामडोह-खामगाव शिव रस्ता ते भारत गुंजाळ वस्ती रस्ता सा.क्र.०/०० ते ०/७५० मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ५६ लाख ०८ हजार ८०८ रुपये.
४) सुरेगांव (गंगा) ते बोरगाव रस्ता सा.क्र. ०/०० ते १/०० मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ७८ लाख ७१ हजार २४६ रुपये.
५) जैनपुर-बेलपिंपळगाव रस्ता (सांगडे वस्ती) ते विठ्ठल मंदीर रस्ता सा.क्र.०/०० ते १/०० मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरण ७८,
लाख ७१ हजार २४६ रुपये
असे एकूण ४ कोटी ०४ लाख ९७ हजार ४६९ रूपये खर्चाचे नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


