Saturday, November 15, 2025

भेंडा पाणी योजनेतील ६ गावांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा;पाणी जपून वापरण्याचे अवाहन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

मुळा उजवा कालवा दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील ४५ दिवस पाणी मिळणार नसल्याने भेंडा-कुकाणा व इतर चार गावांना पुढील काही दिवसांकरिता दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.वैशाली शिंदे यांनी दिली.

अधिक माहिती देतांना सौ.शिंदे यांनी सांगितले की, भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द,कुकाणा, तरवडी,चिलेखन व अंतरवाली या सहा गावांना श्री संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समिती मार्फत नळाव्दारे शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो.
त्यासाठी भेंडा येथे जलसाठवण तलाव असून मुळा पाटबंधारे विभागाने दि.०२ नोव्हेंबर रोजी पाणी दिलेले असून आपला साठवण तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून दिलेला आहे. मुळा उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने वारंवार पाणी सोडणे पाटबंधारे विभागास शक्य होणार नाही. त्यामुळे तलावातील उपलब्ध पाणी संस्थने किमान ४५ दिवस पुरेल अशा प‌द्धतीने पाण्याचे नियोजन करावे असे पत्र मुळा पाटबंधारे विभागाने संस्थेस दिलेले आहे.त्यामुळे एक दिवसाआड होणाऱ्या नळ पाणी पुरवठ्या ऐवजी आज पासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार.

त्यामुळे संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समिती भेंडा, कुकाणा व इतर चार गावे या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व गावाच्या ग्रामपंचायतींनी आपापल्या गावातील पिण्याच्या पाण्याचे योग्य त्या प‌द्धतीने व काटकसरीने नियोजन करून पाण्याचा वापर करावा व पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळावा. तसेच आपल्या अधिकृत नळ कनेक्शन धारकांच्या संख्येनुसार आपणांस दैनंदिन किती पाणी आवश्यक आहे हे संस्थेस ताबडतोब कळवावे.म्हणजे त्यानुसार संस्थेस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करता येईल.

६ गावांच्या ग्रामपंचायतीकडील थकीत पाणीपट्टी..
भेंडा-कुकाणा व इतर सहा गांवातील नळ पाणी पुरवठ्याची ऑक्टोबर २०२५ अखेर ८४ लाख १० हजार २९९ रुपये पाणी पट्टी रक्कम थकीत आहे.ती अशी…
भेंडा बुद्रुक (३४ लाख ४५ हजार ८१९ रुपये), भेंडा खुर्द ( २ लाख २५ हजार ९१० रुपये),कुकाणा (३१ लाख ३९ हजार ६३४ रुपये), तरवडी (८ लाख ७४ हजार ५८५ रुपये), चिलेखन( ३ लाख ३४ हजार ३१६ रुपये),अंतरवाली(३ लाख ८९ हजार ८३८ रुपये).
तरी सर्व ग्रामपंचायतीने थकबाकी भरून सहकार्य करावे असे अवाहन सचिव श्री.भिसे यांनी केले आहे.

*पाणी योजने कडील शासकीय थकबाकी…
मुळा पाटबंधारे पाणी पट्टी- ८ लाख रुपये,थकीत विज बिल – ८५ लाख रुपये.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!