नेवासा/प्रतिनिधी
अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी बुधवार दि. १२ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुलभैया शेख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
नेवासा तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. तसेच शेतकरी बांधवांना पीक अनुदान देखील मिळाले नाही. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मिळत नसल्याने नवीन तक्रार टेबल तहसील कार्यालयात लावावा, तसेच आठ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यापुढे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास हयगय झाली तर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी दिला.
या मागणीची दखल घेऊन तहसीलदार डॉ. संजय बिराजदार व सर्व अधिकाऱ्यांनी लगेच तीन तक्रार टेबल लावले. त्याचबरोबर आठ दिवसांत सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळून जातील असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.


