Wednesday, November 26, 2025

राज्यातील १२५.६७ लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी असलेले प्रादेशिक सह संचालक (साखर) यांचे आधीप्त्याखाली येणाऱ्या अहिल्यानगर विभाग ऊस गाळपात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात १३ सहकारी आणि ९ खाजगी असे एकूण २२ कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी २० नोव्हेंबर अखेर १५.७६ लाख टन उसाचे गाळप करून १०.५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.अहिल्यानगर विभागाचा साखर उतारा ६.७२ टक्के आहे.महाराष्ट्र राज्यात २० नोव्हेंबर अखेर १५० कारखान्यांकडून १२५.६७ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे.

महाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात दि. २० नोव्हेंबर अखेर ८० सहकारी व ७० खाजगी अशा एकूण १५० साखर कारखान्यानी १२५.६७ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९३.९३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ७.७४ टक्के आहे.

*कोल्हापूर विभाग:– ३१.६४ लाख टन उसाचे गाळप करून कोल्हापूर विभागाने २७.२३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा ८.६१ टक्के इतका आहे. विभागात २१ सहकारी आणि १० खासगी असे ३१ कारखाने सुरु आहेत. ऊस गाळप आणि साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे.

*पुणे विभाग:–पुणे विभागात १६ सहकारी आणि ८ खाजगी असे एकूण २४ कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत २९.७६ लाख टन उसाचे गाळप करून २३.९८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा ८.०६ टक्के आहे.

*सोलापूर विभाग:– ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १२ सहकारी आणि २० खाजगी असे एकूण ३२ कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात २८.८५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून १९.६५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ६.८१ टक्के इतका आहे.

*अहिल्यानगर विभाग:– अहिल्यानगर विभागातील १३ सहकारी आणि ९ खाजगी असे एकूण २२ कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी २० नोव्हेंबर अखेर १५.७६ लाख टन उसाचे गाळप करून १०.५९ लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा ६.७२ टक्के आहे.

*छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर विभागात ९ सहकारी व ६ खाजगी अशा १५ कारखान्यानी
१०.४१ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ६.४३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ६.१८ टक्के इतका आहे.

*नांदेड विभाग:– नांदेड विभागात ९ सहकारी व १५ खाजगी अशा २४ कारखान्यानी ८.२५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ५.२८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ६.४ टक्के इतका आहे.

*अमरावती विभाग:– अमरावती विभागातील २ खाजगी कारखाने सुरु असून १ लाख टन उसाचे गाळप करून ०.७७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा ७.७ टक्के आहे.

*नागपूर विभाग:– नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झालेला नाही.

मागील वर्षी याच काळात १७.६१ लाख टन उसाचे गाळप होऊन ८.४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणत गाळप झाले आहे.
—————————-

*अहिल्यानगर जिल्हा*
———————-
अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यानी दि.२० नोव्हेंबर अखेर
१४ लाख ८० हजार ७२३ मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन ९ लाख ७५ हजार ३२० साखर पोती उत्पादित केली.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ६.५९ टक्के आहे.जिल्हयातील इतर कारखान्यांचे ऊस गाळप मेट्रिक टन व कंसात साखर उत्पादन (पोती) असे…

ज्ञानेश्वर १४४३९०(१०८६००),मुळा १३३५८०(८४९५०),संजीवनी ४२६२४(२३५२५),कोळपेवाडी ७९५२०(६३१७५),गणेश १७०००(४२५०),अशोक ५३८०० (३७६००),प्रवरा ९१५५०(४७१००),
श्रीगोंदा १२५२८० (१०४१००), संगमनेर ९८२५०(७३२३०),वृध्देश्वर ४४१८० (२८३००),अगस्ती २८३८३ (१९४००),क्रांती शुगर २९६१५ (२४२५०),अंबालिका २८९०२५ (१७४६००),गंगामाई १२९५३०(५०७००),प्रसाद शुगर ५९७७०(५२६५०),बारामती ऍग्रो ५१८३५(४२५००),स्वामी समर्थ ३९६५० (२६६३९), ढसाळ ऍग्रो २२७३९(९७६०)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!