नेवासा/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक वेळ संधी द्या, विकास करून नेवासा शहराचा बारामती सारखा विकास करू असे आश्वासन युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी दिले.
नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नेवासा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा
भव्य प्रचार शुभारंभ नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते अब्दुलभैया शेख, तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे यांची प्रमुख उपस्थित
झाला.त्यावेळी श्री.शेख बोलत होते. होती.
पैस खांबाला पुष्पहार अर्पण करून माऊलींच्या दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रचार शुभारंभ केला.
नगरपंचायत निवडणुकीतील सर्व उमेदवार (जसे की सचिन कडू पाटील, उज्वला गव्हाणे, हेमा सदाफळ, सुभाष टेमक, सचिन क्षीरसागर, श्रीकांत बर्वे, भारत डोकडे, अल्पेश बोरकर, कल्याणी लंगे, माधुरी जाधव, प्रतीक रोजुळ, अंजून शेख, शुभांगी बेहळे, छाया कदम, रवींद्र पिंपळे, अक्षय मोरे यावेळी उपस्थित होते.
परिसरातील विविध सामाजिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर गणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रचार रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
प्रचार शुभारंभाला बाबासाहेब कांगुने, शैलेश पाटील, टेमक सरपंच, अरुण जाधव, प्रीती शेलार, प्रदीप माने, अरुण बर्डे, राम शेजुळ, श्याम मोरे, सागर शिंदे, शेखर गव्हाणे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण परिसर शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


