नेवासा/प्रतिनिधी
कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी फायदेशीर आहे. परंतु तो चुकीच्या पध्दतीने वापरल्यास नुकसान हे ठरलेलेच आहे. मानवी जीवनातील मोबाईलचा अतिरेकी वापर होत आहे. अजान बालका पासुन ते वृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील लोक मोबाईल वापरतात . त्यात अनेक फिचर आहेत. एआय तंत्रज्ञान ही आले आहे. पण त्याचा सकारात्मक आणखी ज्ञान मिळवण्यासाठी वापर केला तर तो फायदेशीर ठरेल अन्यथा नकारात्मक, अतिरेकी, खेळणं म्हणुन वापरल्यास नुकसान हे होणारच असे स्पष्ट मत पमश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी माध्यमिक विद्या मंदिर १९८३ च्या १० वी बॅचने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते झाले ,त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री.पवार पुढे म्हणाले की, आजची तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. गुटखा,मावा, सिगारेट, मद्य बरोबरच अनेक प्रकारची व्यसनं जबरी आहेत. नगर जिल्ह्यात नऊ कोटींचा गुटखा खाल्ला जातो. अनेक कोटींचा विकला जातो. त्यातच मोबाईलचे व्यसन अनेकांना जडले आहे. वेगवेगळे फिचर वापर करत आहे. लहान बाळाचे रिल बनवले जात आहे. त्याला शांत करण्यासाठी, खेळण्यासाठी मोबाईल दिला जात आहे. अनेक लोक काज्ञम मोबाईल वर बिझी असतात. जेवताना ही वापर करतात. मुलं शाळेत मोबाईल आणतात. त्याचा ज्ञाना साठी वापर करत असतील पण इतर वापर ही वाढला.
पालकांनीच आता मोबाईल पासुन थोडं दुर व्हावं आणि पाल्यांना ही दुर करावं दहावी बारावी पर्यंतचे मुलं आई वडिलांनी लक्ष ठेवून सांभाळणं गरजेचे आहे. याच वयात मुलं घडतात . मुलींना संधी आहे. मोबाईल चा वापर योग्य करा ,आहारी जाऊ नका.अन्यथा क्षणात वाटोळे होण्याचा धोका आहे.
पुर्वी पेक्षा शाळा सुधारल्या आहेत. इमारती,शिक्षक ,ग्रंथालय सर्व सुविधा आल्या . पण आता संस्कार शाळा व्हायला हव्यात विद्यार्थी संस्कारित होणे गरजेचे आहे. शाळा सुधारली तर गाव सुधारेल,गाव सुधारले तर देश सुसंस्कृत व संपन्न होईल. गावात आधार देणारी माणसं असल्यास गावावरीरल संकट कळतील. राजकिय व्यवस्था जनकल्याणासाठी काम करते. राज्यकर्ते हि प्रेरणा असते. राज्यकर्त्यांना दोष देण्या पेक्षा आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे. आदर्श माणुस बनुन एकमेकांना मदत करा.
निसर्गाने भरपूर दिले आहे, येत्या पंचविस वर्षात दिलेले परत केले नाही तर मानवी जिवन संकटात येणार आहे. निसर्गाचे संगोपन करा. आपल्या मातीत संतांची प्रेरणा आहे. त्यांचे जिवन समजुन घेणे महत्वाचे आहे. गावातील व्यक्ती, संस्था, संघटना यांनी जर ठरवलं तर आदर्श गाव व्हायला वेळ लागणार नाही असे शेवटी सांगितले.
यावेळी नानासाहेब रेपाळे, फादर अब्राहम रणनवरे, ज्ञान माऊली च्या प्रा क्विनिटा. गुरुकुल चे विष्णू कराळे, घो या वि मं च्या उप प्रा लंके मॅडम, जि पण शाळा घ्या नन्नवरे मॅडम अशोक एळवंडे, जनार्दन सोनवणे,छबुराव एळवंडे, दत्तात्रय ब-हाटे , राजेंद्र जरे, बापुराव सोनवणे , राजेंद्र चेमटे , प्रल्हाद ब-हाटे, आसाराम ब-हाटे, शांताराम सोनवणे, दत्तात्रय काळे यावेळी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेतील चार शाळेतील विद्यार्थी सहभागी शंभर मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले.भाऊसाहेब ब-हाटे यांनी प्रस्ताविक केले. संजय चौधरी यांनी आभार मानले.


