मुबंई दि.३ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०२४ व २०२५ चे
राज्य सांस्कृतिक पुरस्कार व राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये यंदा भारुड/विधीनाट्य/ या विभागातून भातकुडगाव(ता.शेवगाव) येथील राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद (2024) यांची निवड झाली आहे.
याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दि.३ डिसेंबर २०२५ रोजी शासन निर्णय जारी करून पुरस्कारांची घोषणा केली आहे.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीने निवड केल्यानुसार खालीलप्रमाणे वर्ष निहाय पुरस्कार्थीची नावे अशी…
*राज्य सांस्कृतिक पुरस्कार*
कलाक्षेत्र
१) नाटक- श्री.अरुण कदम (२०२५)
२)कंठसंगीत-श्री.धनंजय जोशी (२०२५)
३)वाद्यसंगीत-श्री.विजय चव्हाण (ढोलकी) (२०२५)
४)मराठी चित्रपट-श्री. शिवाजी लोटन पाटील (२०२५)
५)उपशास्त्रीय संगीत-श्री.उदय भवाळकर (२०२५)
६)किर्तन / समाजप्रबोधन-श्री. गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (२०२५)
७)तमाशा-श्री. कोंडीराम आवळे (२०२५)
८)शाहिरी-शाहिर मधुकर मोरे (२०२५)
९)नृत्य-श्रीमती रंजना फडके (२०२५)
१०)लोककला-श्री.हरिभाऊ वेरुळकर (२०२५)
११)आदिवासी गिरीजन-श्री. रायसिंग हिरा पाडवी (२०२५)
१२)कलादान-श्री. चंद्रकांत घरोटे (२०२५)
१३) प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार-प्रा. आनंद गिरी (२०२४) व श्री. संजीव भागवत (२०२५)
१४)लोकनृत्य-श्री. सुभाष नकाशे (२०२४) व श्री. अरविंद राजपूत (२०२५)
१५)लावणी/संगीतबारी-श्रीमती शकुंतला नगरकर (२०२४) व श्रीमती कल्पना जावळीकर (२०२५)
१६)भारुड/विधीनाट्य/गौळण-श्रीमती पद्मजा कुलकर्णी (२०२४) व श्रीमती गोदावरी मुंडे (२०२५)
१७)वाद्यनिर्मिती करणारे कलाकार-
श्री. युसुफ घडूलाल मूल्ला (२०२४) व श्री.भालेराव नागोराव दडांजे (२०२५)
१८)झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत-श्री.रामदास चौधरी (२०२४) व श्री.बुधा भलावी (खडीगमंत) (२०२५)
१९)दशावतार/नमन खेळ / वहीगायन-श्री. ओमप्रकाश यशवंत चव्हाण (२०२४) व श्री. भानुदास शंभा सावंत (२०२५)
२०)दुर्मिळ, प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती /संस्था-श्री.धर्मा कांबळे (डक्कलवार) (२०२४) व श्रीमती साखराबाई टेकाळे (२०२५)
२१)प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था-तांबेश्वर शाहिरी कलापथक (शाहिर तुकाराम ठोंबरे) (२०२४) व विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (२०२५)
२२)ध्वनीतंत्रज्ञ / संकलक पुरस्कार-
श्री. अविनाश ओक (२०२४) व श्री.महेश अंबेरकर (२०२५)
२३)संगीत संयोजन-श्री.अमर हळदीपूर (२०२४) व श्री. कमलेश भडकमकर (२०२५)
२४)व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट /निवेदन-
श्री.अंबरीश मिश्र (२०२४) व श्री. उदय सबनीस (२०२५)
——————————–
राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार
१)नाटक-श्रीमती तेजश्री प्रधान (२०२४) व श्री. भूषण कडू (२०२५)
२) कंठसंगीत-श्री. धनंजय म्हसकर (२०२४) व श्री. मयुर सुकाळे (२०२५)
३) वाद्यसंगीत-श्री.ऋषिकेश जगताप (२०२४) व श्री. वरद कठापूरकर (२०२५)
४)मराठी चित्रपट-श्रीमती मधुरा वेलणकर (२०२४) व श्री. शंतनू रोडे (२०२५)
५)उपशास्त्रीय संगीत-श्री. राहूल देशपांडे (२०२४) व श्री. भाग्येश मराठे (२०२५)
६)किर्तन/समाजप्रबोधन- श्री.जयवंत बोधले (२०२४) व श्री. ज्ञानेश्वर माऊली कदम (२०२५)
७) तमाशा-श्री. नितीन बनसोडे (२०२४) व श्रीमती अमृता थोरात (२०२५)
८) शाहिरी-शाहिर आझाद नाईकवडी (२०२४) व शाहिरा अनिता खरात (२०२५)
९)नृत्य-श्रीमती वृषाली दाबके (२०२४) व श्री. संतोष भांगरे (२०२५)
१०) लोककला-श्री. संदिप पाल महाराज (२०२४)व श्री. चेतन बेले (२०२५)
११)आदिवासी गिरीजन-श्री. साबूलाल बाबूलाल दहिकर (२०२४) श्रीमती गंगुबाई चांगो भगत (२०२५)
१२)कलादान-श्रीमती कस्तुरी देशपांडे (२०२४) श्री. सिध्देश कलिंगण (२०२५)
१३)प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार-श्री. खंडुराज गायकवाड (२०२४) श्रीमती तेजस्विनी चव्हाण-आचरेकर (२०२५)
१४)लोकनृत्य-श्री. दिपक बीडकर (२०२४) श्री. गणेश कांबळे (२०२५)
१५)लावणी / संगीतबारी-श्रीमती प्रमिला लोदगेकर (२०२४) श्रीमती वैशाली वाफळेकर (२०२५)
१६)भारुड/विधीनाट्य/गौळण-श्री. हमीद सय्यद (२०२४) व श्री. रामानंद उगले (२०२५)
१७)वाद्यनिर्मिती करणारे कलाकार-
श्री. उमाशंकर दाते (२०२४) व श्री. सर्वजीत विष्णू पोळ (२०२५)
१८)झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत-
श्री. मुकेश देशमुख (२०२४) व श्री. दुधराम कावळे (झाडीपट्टी) (२०२५)
१९)दशावतार/नमन खेळ / वहीगायन-
श्री. लक्ष्मीकांत नाईक (२०२४) व श्री. रामकृष्ण कैलास घुळे (वहीगायन) (२०२५)
२०)दुर्मिळ, प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती / संस्था-श्रीमती रेणुका शेंडगे जेजूरीकर (२०२४) व श्री. प्रसाद गरुड (२०२५)
२१)प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय / संस्था- सव्यसाची गुरुकुलम श्री. लखन जाघव (२०२४) व इतिहासाचे अबोल साक्षीदार बहुउद्देशिय ट्रस्ट (श्री. निलेश सकट) (२०२५)
२२)ध्वनीतंत्रज्ञ/संकलक पुरस्कार-
श्री. प्रणाम पानसरे (२०२४) व श्री. विराज भोसले (२०२५)
२३)संगीत संयोजन-श्री. अनुराग गोडबोले (२०२४) व श्री. अमित पाध्ये (२०२५)
२४)व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट / निवेदन-
श्रीमती मेघना एरंडे (२०२४) व श्रीमती समिरा गुजर (२०२५)
या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये यंदा भारुड/विधीनाट्य/ या विभागातून राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद (2024) यांची निवड झाली असून, त्यांच्या दीर्घ कलासेवेला आणि लोककलेतील बहुमोल योगदानाला राज्य मान्यता मिळाली आहे.
भारुड या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, अध्यात्मिकता आणि रसिकांचे मनोरंजन यांचा सुंदर संगम साधणाऱ्या हमीद अमीन सय्यद यांनी अनेक दशके आपल्या अनोख्या शैलीने सभोवतालचा समाज जागृत ठेवला आहे. पारंपरिक भारुड सादरीकरणास आधुनिक भावार्थ देत, लोकसंस्कृतीचे जतन करण्याची त्यांची तळमळ विशेष स्तुत्य आहे.
यावर्षीच्या पुरस्कारांचे स्वरूप : ₹१,००,०००, मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा आज ३ डिसेंबर रोजी सांयकाळी मुंबईत दिमाखात पार पडणार आहे.


