Tuesday, December 16, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या टप्प्यात आले आहेत. या पैकी ९ पोलीस निरीक्षक सध्या पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पहात आहेत.

राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीच्या कक्षेत विचाराधीन असलेल्या ४४८ पोलीस निरीक्षकांची निवड सूची नुकतीच् जाहीर केली आहे. या निवड सूचीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या टप्प्यात आले आहेत. या मध्ये कंसात सध्या नियुक्तीचे ठिकाण धनंजय जाधव (जिल्हा विशेष शाखा) इशामोदीन पठाण (महिला व बाल अपराध शाखा) विलास पुजारी पाथर्डी पोलीस ठाणे, जगदीश बांबळ तोफखाना, नितीन चव्हाण राहता, सोपान शिरसाठ कर्जत, दशरथ चौधरी जामखेड, संदीप कोळी कोपरगाव, संजय सोनवणे आश्वी, रामकृष्ण कुंभार कोपरगाव पोलीस ठाणे व नंदकुमार दुधाळ वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय यांचा समावेश आहे.

या मधील सेवा जेष्ठता यादी मधील कोणत्या पोलीस निरीक्षकांची पदोन्नती होत आहे याची उत्सुकता जिल्ह्यातील पोलिसांना लागून राहिली आहे. तसेच पोलीस ठाणे प्रभारी असलेल्या विद्यमान पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या पोलीस ठाण्याकडे इतर कनिष्ठ पोलीस निरीक्षकांचे देखील डोळे लागलेले असतात.

निवृत्तीसाठी अधिक काळ शिल्लक असल्यास व पोलीस ठाणे पदी प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्तीस असल्यास अनेकदा पोलीस उपअधीक्षक पदोन्नतीसाठी पोलीस निरीक्षक अनिच्छुक असतात.

वरील नमूद पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल तसेच विभागीय चौकशी, संक्षिप्त चौकशी, इतर चौकशी, न्यायालयीन प्रकरणे, शिक्षा इत्यादी बाबींची मागणी केलेली आहे. वरील बाबीची पूर्तता झाल्यानंतरच पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत. पदोन्नतीची अंतिम घोषणा पुढील एक दोन महिन्यांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
यामधील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सन २०२३ साली राहुरी पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी असताना वैयक्तिक कारणास्तव पदोन्नती नाकारली होती. त्यामुळे जाधव यांची पदोन्नती निश्चित मानली जाते.
ठराविक सेवा कालावधीनंतर शासकीय अधिकारी अंमलदार यांना पदोन्नती देण्यात येते. त्या प्रमाणे पोलीस निरीक्षकांना देखील निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे शासनाचे धोरण आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!