Sunday, March 29, 2026

युवाशक्ती देशाचे भविष्य-प्रा.संतोष सोनवणे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

युवकांनी संस्कार व संस्कृती जपत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत योगदान द्यावे. योग्य दिशेने वाटचाल करत आपले स्वप्न साकार करावे. युवाशक्ती देशाचे भविष्य आहे. देशाच्या शाश्वत विकासात युवकांची भूमीका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिजामाता उच्च माध्यमिक विभागातील मराठी विषयाचे प्रमुख प्रा.संतोष सोनवणे यांनी केले .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर प्रसंगी दि. ९ जानेवारी २०२५ रोजी नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथे ‘शाश्वत विकासात युवकांची भुमिका’ या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. शिबीरातून विद्यार्थी ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व जल व्यवस्थापन, वृक्षारोपण, समाज जागृतीसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक डॉ. संजय महेर, डॉ. रामदास आर्ले, कार्यक्रम अधिकारी डॉ.मोहीनी साठे, प्रा.वैभव लाटे, प्रा. देविदास सोनवणे, प्रा.सुलतान आत्तार, रमेश भालेकर यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!