Wednesday, February 11, 2026

शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्वाची-काशीनाथ आण्णा नवले

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. देशाचे उज्ज्वल भविष्य त्यांच्या हाती आहे. शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ अण्णा नवले यांनी केले.

नेवासा तालुक्यातील खडेश्वरी देवस्थान, नजिक चिंचोली येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिजामाता शास्र व कला महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” शाश्वत विकासासाठी युवक- पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन” उपक्रमांतर्गत सात दिवसांचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीर उदघाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून श्री.नवले बोलत होते. ह.भ. प.स्वामी गणेशानंद महाराज, ह. भ. प.भागचंद महाराज पाठक, श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त काकासाहेब शिंदे, शिवाजी कोलते, डॉ. नारायण म्हस्के, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, कार्यक्रम अधिकारी प्रा. आतार सुलतान आणि प्रा. देविदास सोनवणे, नजिक चिंचोली गावचे सरपंच सौ. वनमाला चावरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय पाठक, सोपान चौघुले, बाबुराव चावरे, ईश्वर पाठक, उद्योजक शिवाजीराव पाठक, दिगंबर पाठक , बाळासाहेब पाठक, संजय पाठक, नानासाहेब बोरुडे, भाऊसाहेब चौघुले, हरिभाऊ विधाटे, प्राध्यापकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक व रा. से. योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय महेर यांनी प्रस्ताविक केले. रा. से. यो. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मोहिनी साठे यांनी सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.वैभव लाटे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!