Sunday, March 29, 2026

कुकाणा गावात एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील बस स्थानक परिसर, जेऊर हैबती चौक, देवगाव चौक व नेवासा रोड परिसरातील पाच दुकानात काल रविवार दि. ११ पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरीच्या घटना घडल्या. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही संचासह कृषीपंप, रोख रक्कम चोरून नेली आहे. मात्र चोरट्यासह त्यांचे वाहन काही ठिकाणच्या सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे लवकरच तपास लागणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

कुकाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अशोक गांधी यांच्या किराणा दुकानाचे शटरचे लॉक तोडून चोरट्यानी गल्ल्यातील किरकोळ रक्कम नेली. सीसीटीव्ही डीव्हीआर काढून नेला. आर्ले पाटील पतसंस्था दरवाजाचे तीन दरवाजा लॉक तोडले.
जेऊर हैबती चौकात दत्त मशिनरी दुकानातून कृषीपंप तसेच साईश्रद्धा पेट्रोल पंपासमोरच्या दोन दुकानात किरकोळ चोऱ्या झाल्या.

पोलिसांची गस्ती वरील गाडी तीन वाजता येवून गेल्यानंतर सव्वा चार वाजेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे चोरट्यानी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही संच पळवून नेले आहेत. लगतच्या काही दुकानातील सीसीटीव्हीत एक कार आणि पाच जण आढळून आले आहे.

पोलीस निरीक्षक महेश पाटील, कुकाणे दूरक्षेत्र उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांच्या पथकांसह नेवासा चोऱ्या झालेल्या दुकानात पाहणी केली. श्वान पथकाकडूनही तपास करण्यात आला मात्र, फारसा उपयोग झाला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याने तपासाला मदत होईल, याचा तपास लवकर लागेल, असा विश्वास उपनिरीक्षक अहिरे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!