Saturday, June 13, 2026

कडूभाऊ काळे यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट व नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ छगनराव काळे यांना महाराजा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. फलटण पुरस्कृत  यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
फलटण येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित श्री सद्‌गुरु प्रतिष्ठान, फलटण व श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या सहकार्याने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव वर्षानिमित्त समस्त वारकरी संप्रदायास समर्पित ३० वे विभागीय स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी श्री ज्ञानाई गुरुकुलाचे प्रमुख ह.भ.प. सुरेश महाराज सुळ यांचे हस्ते व ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे उपस्थितीत कडूभाऊ काळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

*कडूभाऊ काळे……*

या पुरस्कारा बाबद बोलताना कडूभाऊ काळे म्हणाले की, नागेबाबांची कृपा आणि भेंडा परिसरातील सर्व स्नेहीजनांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सहकार्य असल्यामुळेच आपण करीत असलेल्या कामाला गती आली. तुम्ही सर्वजण खंबीरपणे सोबत आहात म्हणूनच हा नागेबाबांचा रथ निरंतर चालू आहे. हे सर्व श्रेय भेंडा परिसराचे आहे. परमेश्वराने या कामासाठी माझी निवड केली आणि तुम्ही सर्वांनी साथ दिली. घरातील कोणीतरी करता माणूस असतो, म्हणून त्याचे नाव पत्रिकेच्या पाकिटावर असते तसे माझे आहे. मी निमित्त मात्र आहे, परमेश्वराने विश्वास ठेवला, तुम्ही सर्वांनी साथ दिली. आजही तुम्ही सर्वजण मनोभावे सोबत आहात, त्यामुळे या पुरस्काराचे सर्व श्रेय आपला परिसराच्या आहे, तुमचे आहे. कडूभाऊ काळे ही व्यक्ती फक्त निमित्त मात्र आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!