Wednesday, February 11, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी;१२ गुन्हे उडकीस आणुन ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कोठेवाडी खुन प्रकरणातील आरोपी व त्याचे साथीदारांकडुन चोरीचे १२ गुन्हे उडकीस आणुन ८ लाख ०२ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबद अधिक हकीगत अशी की, दि. १५/०१/२०२६ रोजी रोजी रात्रीचे ०२ वाजेचे सुमारास फिर्यादी यांची मुलगी व सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यानी जबरदस्तीने घराचा दरवाजा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी श्रीमती विमल बबन ढाकणे रा. ढाकणेवस्ती, शेवगाव जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाणे गु.र.नं. २९/२०२६ बी. एन. एस, २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक हरिष भोये,अंमलदार दिपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाद, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड महिला भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे चालक चंद्रकांत कुसळकर, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.

नमुद पथकाने गुन्ह्यातील आरोपींबाबत गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित करुन आरोपीचे शोध घेत असतांना दि. १७/०१/२०२६ रोजी पथकास सदरचा गुन्हा आरोपी नामे रोहित नादर चव्हाण हा त्याचे साथीदारास केला असुन तो बाराबाभळी ते चंदबीबी महल परिसरात येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार पथकाने बाराबाभळी ते चंदबीबी महल परिसरात जावुन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम संशयीत रित्या दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांचे नांव १) रोहीत नादर चव्हाण (वय २६ वर्षे) रा.चिचोंडी पाटील ता.जि. अहिल्यानगर, २) बंटी टाबर चव्हाण (वय २७ वर्षे) रा. म्हरोळा ता पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ३) करण शिरसाठ भोसले (वय-२२ वर्षे) रा. पिंपळवाडी, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, ४) अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या (वय ५० वर्षे) रा. पिंपळवाडी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, ५) विशाल टावर चव्हाण रा. म्हरोळा ता पैठण जि. छत्रपती संभाजीनगर (फरार) असे असल्याचे सांगीतले आहे.

त्यानंतर ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन व आरोपीचे सांगणे प्रमाणे ७,०२,००० रुपये कि.चे ५४ ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिणे व सोन्याचे लगड, ५०० रुपये कि.ची पाना व लोखंडी कटावणी, १,००,००० रुपये कि.ची मोटार सायकल असा एकुण ८,०२,४०० रुपये कि.चा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपी मुद्देमालासह शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या हा कोठेवाडी खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगुन आल्यानंतर त्याचे वरील साथीदासह गुन्हा केलेला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांचेकडुन अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!