Wednesday, June 24, 2026

भेंडयात श्री गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री गणेश मंदीर,लांडेवाडी येथे गुरुवार दि.२२  रोजी श्री गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गणेश जन्मोत्सव निमित्त सकाळी रामगिरी महाराज येळीकर(येळेश्वर संस्थान,येळी) यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे.राम महाराज झिंजुर्के,सुनिलगिरी महाराज,गणेशानंद महाराज यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. सोमनाथ तांबे यांच्याकडून महाप्रसाद अन्नदान सेवा, संतपूजन सेवा बबनराव पवार यांच्याकडे, संजय फुलारी व अनिल आरगडे यांचेकडे मंडप व डेकोरेशन सेवा आहे.श्री गणेश जयंती उत्सव निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री गणेश भक्त परिवार लांडेवाडी, ज्ञानेश्वर उद्योग समूह व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे .

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!