Sunday, March 29, 2026

शेतकऱ्यांविषयी आस्था असणारा नेता हरपला-नरेंद्र घुले पाटील

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा,शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील विकासकामांमध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. अजितदादांच्या निधनाने सहकारातील अडीअडचणीची जाण आणि शेतकऱ्यांविषयी आस्था असलेला नेता हरपला अशा शब्दात लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे वतीने शनिवार दि.३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता कारखान्याच्या सभागृहात झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील बोलत होते.
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, संचालक अड.देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, बबनराव भुसारी, पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, विष्णुपंत जगदाळे, सखाराम लव्हाळे, प्रा.नारायण म्हस्के, मछिंद्र म्हस्के, जनार्धन कदम, विकास नन्नवरे, संतोष पावसे, साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, अब्दुलभैया शेख, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,जनरल मॅनेजर रवींद्र मोटे,
व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कामगार नेते नितीन पवार म्हणाले, सर्व प्रश्नांची जाण असणारा अतिशय वक्तशीर आणि स्पष्टोक्त असलेला नेता महाराष्ट्राने गमावला. अजितदादांच्या निधनाने आपल्या घरातीलच व्यक्ती गेल्याची भावना सर्व जनतेच्या मनात आहे.

अब्दुलभैया शेख म्हणाले, अजित दादा म्हणजे परीस,ज्यांना ज्यांना त्यांचा स्पर्श झाला त्या कार्यकर्त्यांच्या जीवनाचे सोने झाले. दादांची जागा कोणी ही घेऊ शकणार नाही.
काशिनाथ नवले, काकासाहेब नरवडे,
गणेश गव्हाणे,बाळासाहेब नवले यांनी ही शब्दरुपी श्रद्धांजली अर्पण केली.

ताहीर पटेल,कृष्णा ढोरकुले, मोहनराव गायकवाड, बाळासाहेब खर्जुले, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, नामदेव निकम, कचरदास गुंदेचा, बाळासाहेब साळुंखे,शंकर भारस्कर, अप्पासाहेब भुजबळ,एकनाथ भुजबळ, बबनराव भानगुडे,भारत साबळे, प्रा.भारत वाबळे,
कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे,उपाध्यक्ष संजय राऊत,तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, महेंद्र पवार, अप्पासाहेब खरड,भगवंता शेंडगे, सुधाकर ढाकणे, मुख्य अभियंता राहुल पाटील,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के,मुख्य लेखापाल रामनाथ गरड, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख, हेड टाईम किपर नेव्हल,इब्राहिम सय्यद,राजेंद्र काकडे,
आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!